सुरळीच्या वड्या...2 विनोदी कथा

माणूस किती कष्ट करू शकतो असं मला वाटून गेलं. आईच्या हाताखालीसुद्धा मी काही केलं नव्हतं.. पण बाईच्या.. जाऊ द्या. महिला आघाडी, स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, समान हक्क वगैरेमुळे बायका फार शेफारल्यात असं वाटलं. आता आरामखुर्चीत पडून पेपर वाचून म्हणत सिगारेट शिलगावली. एक-दोन झुरके घेतले. इतक्यात मिनी बाहेर आली. भयंकर घोटाळा झाल्यासारखा संकटग्रस्त चेहरा. मीच भयभीत झालो. प्रश्नार्थक बघ लागलो. मिनी केविलवाणी झाली होती. 'एक वाटी पिठाला किती वाटया ताक घेतात मला आठवेचना. जरा नाईकीणकाकंना विचारतोस का फोन करूना' आता न करून काय करणार? 'वड्या आवडल्या' म्हणालो होतो ना। मी फोन केला तर नाईककाका म्हणाले. 'ती मैत्रिणींबरोबर मॅटिनीला गेलीय.' मग समोरच्या उषा वहिनींकडे तिने मला पिटाळले. त्यांनाही नक्की प्रमाण माहीत नव्हतं. पण दोघी-तिघींच्या बहमताने सुरळीच्या वडया सुरू झाल्या. ताटांना दोन्ही अंगाने तेल लावणे, ताटांवर शिजलेलं पीठ पसरणं (हात भाजून घेत!), त्यावर भराभरा खोबरं कोथिंबीर पसरणं वगैरे कामात मी तिला भराभरा खोबरं कोथिंबीर पसरणं वगैरे कामात मी तिला मदत केली आणि बाहेर जाऊन वडयांची वाट बघत बसलो. रेशमासारख्या मऊसूत पिवळयाधम्मक वडया, वर ताजी हिरवीगार कोथिंबीर, खोबऱ्याचा शुभ्र दुधाळ कीस. वरून हिंग-मोहरी-खसखशीची फोडणी. सकाळपासनच्या दगदगीमळे मला झोपलागली असावी. साडेबारा- एकच्या सुमारास मिनीने मला उठवले. वड्या खाण्याच्या कल्पनेने सखावलो. 'इतक्यात मिनीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं. दचकलोच. खूप उतरला होता तिचा चेहरा. केविलवाणा झाला होता. अध्याच्यावर तर मीच काम केलं होतं. मग हिला काय झालं थकायला। मी बळेच हसलो. पण ती हसेना. उगीच विचारलं, मिने, दमलीस का गं?' म्हणाली, 'दमायचं काही नाही रे! पण वडया म्हणाव्या तशा जमल्या नाहीत. काय चुकलं काही समजेना. कितीवेळा मोडन केल्या. पण..' मी म्हणालो. 'जाऊ दे! त्याचं काय एवढं? जशा असतील तशा वाढ. एवढी नहस होऊ नकोस.' मिनीने वडया म्हणून ताटात जे वाढलं यावरून माझे सगळे अंदाज चुकल्याचं लक्षात आलं. वडयांच्या ऐवजी पिठाच्या गाठी गाठी ताटात पडल्या. सुरळीच्या वड्यांचे जे रम्य दृश्य मी पाहिलं होतं ते एकदम भंगलं. मीही नव्हस झालो. मिनीचा चेहरा बघून माझी निराशा मी लपवली. मग काही आठवल्यासारखं करीत मिनी म्हणाली, 'अरे! तू डाळीवरच डाळ टाकली होतीस ना? पुष्कळदा गिरणीत भेसळ होते?' 'छे गं! अगदी समोर उभं राहन डाळ दळून घेतली.' 'पण चवीला बऱ्या याल्यात ना रे?' आवंढा व पिठाच्या गोळया गिळत मी म्हणालो. 'तशा बऱ्या झाल्यात.' खरं तर खसखशीतले बारीक खडे दाताखाली कचकच येत होते. मीच निवडले होते. सांगणार कणाला? पिठाचे गोळे गिळवत नव्हते. पण आता काही म्हटलं तर मिनी रडेलच म्हणन तिने काही विचारले की डोळे मोठे करून हसायचा प्रयत्न मी करायचो. म्हणायचो. काही का असेना. चवीला छान झाल्यात.' मित्रांनो, खोटं नाटक करताना किती प्रयास करावा लागतो हे कदाचित तम्हालाही ठाऊक असेल. महागाईचं टाकायचं तरी कसं? एवढी खसखस, खोबरं, कोथिंबीर तिच्यापुढे एक गुठळी तोंडात टाकायचो व तिचं झाल्यात ग वडया?" मिनीचा चेहरा एकदम उतरला. ण तशी ती फार प्रसंगावधानी! 'अहो काकू, वडया इतक्या मस्त झाल्या होत्या म्हणता! रेशमासारख्या मऊसूत. यांनी फस्तच केल्या बघा. (त्यावेळी पिठाच्या गोळ्या टाकलेला तांब्या घेऊन मी मोरीकडे पळत सटलो) आणि थोडयाशा उरलेल्या मी खाऊन टाकल्या. पढच्या वेळी जरा जास्त करीन.' उमा वहिनी गेल्यावर मिनी म्हणाली, 'मुद्दामच त्यांनी चुकीचं माप सांगितलं असावं वाटतंय! खोटारडया. वडया बघायला येतात! पुढे ती बोलली हे ऐकायला मी थांबू शकलो नाही. म्हणजे थांबता आले नाही. पोटात कळा येत होत्या. पाच-सहा धावावं लागलं. नंतर मात्र ठरवलं, यापुढे कधीही कुणाकडचाही पदार्थ आवडला तरी त्याचं बायकोसमोर कौतक करायचं नाही. कारण तो पदार्थ नव्याने जन्मणार आणि वेदना मात्र मला सहन कराव्या लागणार. हा अनुभव मित्रांनो, तुम्हालाही आला असेल ना! द्या तर ! नसेल आला अनुभव,