माणुसकीचा आधार देत विध्यार्थ्यांनी साजरा केला गुरूचा वाढदिवस

अंबाजोगाई / प्रतिनिधी समर्थ कोचिंग कलासेसचे प्रा.सचिन देशमुख (चडल.चरीह) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलासेस च्या विद्यार्थ्यांनी निधी जमवून आधार माणुसकीचा उपक्रमांतिल शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कु.जयश्री शिंदे,मंगईवाडी (१२वी-विज्ञान) ,कु.पल्लवी जाधव, नेत्रुड (१२वी-विज्ञान) ,चि.राहुल शिंदे,मंगईवाडी (१० वी) यां विध्यार्थी ना ५ ते ७ हजार रुपयाची पुस्तकाचे वाटप करून या विद्यार्थ्यांना माणुसकीचा आधार दिला. या सामजिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रशांत बर्रदापुरकर (सकाळ-पत्रकार)तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुधाकर शिंदे (मुख्याधापक) ग ,प्रा.सुरवसे (डायट),श्री ज्ञानेश्वर नं।दवटे,श्री विजय देशमुख उपस्थित होते. या प्रसंगी आधार माणुसकीचा उपक्रमांचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी मनोगत वेक्त करतांना समर्थ कलासेसच्या विद्यार्थ्यांनी गुरुच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या आनावश्यक खर्चास फाटा देऊन वंचित गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करून सामजिक बांधीलकी जोपासण्याचे कार्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गुणवत्ता धारक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्यासाठी आधार माणुसकीचा परीवार सोबत राहील असे आश्वासन ऍड पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रशांत बर्रदापुरकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम व जिद्दीने अभ्यास करून आईवडीलाचे स्वप्नं पूर्ण करून चांगले नागरिक बनून स्वतः चांगले जिवन जगत समाजातील वंचित कुटुंबाना मदत केली पाहिजे.आधार पुस्तकाचे माणुसकीचा उपक्रमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त व एच.आय.व्ही. बाधित कुटुंबातील मुलांना शिक्षण,आरोग्य,विवाह यासाठी लोकसहभागातून निधी व साहित्य गोळा करून सहकार्य करण्यात येत आहे, विध्यार्थ्यांनी वंचित कुटुंबातील मुलांना पुस्तके दिली, या बद्दल मुलांचे अभिनंदन केले.तसेच प्रा.सचिन देशमुख हे विद्यार्थ्यांना चांगले संस्कार-अध्यापन करत असल्या बाबत आभार मानले व प्रा देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी निश्चितच चांगले घडतील,असे मत व्यक्त केले. जोपासण्याचे प्रास्ताविक प्रा.विजय देशमुख तर आभार प्रा.सचिन देशमुख यांनी मानले.