कादा दारामध्ये घसरण सुरु

 कषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरु झाली आहे. अवकाळी पावसाने कांदा उत्पादनात घट झाल्यामुळे मिळणारे दर शेतकरी वर्गाला परवडत नाहीत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी या मागणीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार सभापती सुवर्णा जगताप यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी बोलणी केली. यामध्ये कांदा निर्यात बंदी आणि कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा __उठवण्यासाठी विनंती केली असल्याची येथील माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. सद्यस्थितीत बाजार समितीच्या लासलगाव, निफाड आणि विंचुर उपबाजार आवारात दररोज साधारणतः ३० ते ३५ हजार विंटल अली खरिप कांद्याची विक्री होत आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्रीस येणा-या अली खरीप कांद्याची टिकवण क्षमता कमी कृषी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातून लगेच विक्री केल्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे येथील बाजार बंदी समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस येत आहे.