सुरळीच्या वड्या...1 विनोदी कथा

जन्म म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा नव्हे बर का! हा जन्म आहे एका पदार्थाचा. त्या आठवणीनेच माझ्या पोटात कळा यायला लागतात. घामाघूम होऊन जातो मी. मित्रानो, मी भागलय ते तुम्ही भागू नये म्हणून.विशेषत: नवीन लग्न झालेले असाल तर ही कथा तुम्हाला मार्गदर्शक होईल. अलीकडे ही म्हणजे-मिनी एखादा पदार्थ करते म्हणाली की मला हडहडीच भरून येते. आधी बाहेर जाऊन मक्सा फॉर्म' किंवा 'लोमोटील' वगैरे पोट बिघडल्यावर घेतात त्या गोळ्या घेऊन येतो. मनाची तयारी करून पाटावर जाऊन बसतो. खरं तर दूर कुठेतरी पळून जावं असंही वाटतं. पण आपल्या तरुण पत्नीला एकटं टाकून असं बेजबाबदारपणे निघूण जाणं तरी बरं दिसतं का! समाजाला विषय देण्यापेक्षा एकटयानं भोगलेलं बरं. भगिनींनो, तुम्ही म्हणाल एवढंकाय भोगलं? बायको एखादा पदार्थ इतक्या प्रेमाने करते म्हणते तर तिचं कौतुक जाऊ द्या, पण असं एकदम पळन वगैरे.. नाही तरी सगळे मेले पुरुष अस्सेच- भगिनी असं म्हणतील. पण पुरुषांना कदाचित पुनःप्रत्ययाच दुःख आठवल. असा. आता नमनालाच घडाभर तेल परे! एकदा नेहमीपेक्षा वेगळी (अगदी वेगळी) सकाळ उगवली. अजूनही ती आठवण.. रविवार असूनही मिनी लवकर उठली. माझा थोडासा हिरमोडच झाला, पण हे दःख पुढच्या दुःखापुढे अगदी नगण्य. मलाही ती उठवायला लागली. "ऊठ ना! आज किन्नई मी तुझ्या आवडीचा पदार्थ करणारै! पर्वा तू त्या नायकीणबाईंकडे (मी दचकलोच. पण नाईक आडनावाच्या बाई) त्या सुरळीच्या वड्या खाल्ल्या होत्या ना त्या करणारे! तुला खऽऽप आवडल्या होत्या.” (खूऽ ऽप या शब्दात ददे आणि उपरोध आणि मीही करू शकते असे अनेक अर्थ) त्या वडया खरंच मला खूप आवडल्या होत्या, तसं नाईकीणबाईना बोलून दाखवलं होतं. (ती फार घोडचूक झाली हे उशिरा कळलं.) सौ. मिनी मला उठवीत होती. खरं तर आज एक दिवस सुट्टीचा! आरामात उठून चहा घेत पेपर वाचायचा. पुन्हा चहा घेत सध्याकाळचे किवा मॅटिनीचे बेत रचायचे. पुन्हा कॉटवर लोळायचं. पण सगळे प्रकल्प रद्द झाले. मी चिडू नये म्हणून मिनीने तिचे एवढेसे केस माझ्या गालावर फिरवले, 'उठतोस ना!' लाडिक आवाज- 'वडया खायच्यात ना!' 'अगं, मला वडया खायच्यात खरं आहे. पण त्यांचा माझ्या उठण्याशी काय संबंध? ती लाडिकपणे म्हणाली, हे काय! तू उठल्याशिवाय मला सगळे पदार्थ कोण आणून देणार! आणि या वडया केवळ तुझ्यासाठीच मी करणारे! मला नाही एवढी आवड आणि खाण्याची होस!' (म्हणजे माझ्यावर उपकार आणि मीच खादाड असा गर्भित अर्थ) नाही एवढी आवड आणि खाण्याची होस!' (म्हणजे माझ्यावर उपकार आणि मीच खादाड असा गर्भित अर्थ) उठणं भाग होतं, नाहीतर रविवारचा विचका. चहाबरोबर खारी बिस्किट-जी फार महाग असतात म्हणून व तुपकट असतात म्हणून मला मोजकीच मिळत; तिने अगदी बरणी पुढे ठेवून दिली. मीही चवीने खाल्ली. मिनीचा मूड बघून जरा अधिकच. तरीही तिने बरणीकडे पाहिले नाही. अघोळ लवकर उरकावी लागली. पैसे सहज हातात ठेवत मिनी म्हणाली, 'पळ आता! ओला नारळ, तीळ, खसखस, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, अर्धा लिटर दही, चण्याची डाळ घेऊन ये. मी तिच्याकडे बघितल्यावर म्हणाली, 'हे सगळं आवश्यकच आहे! तुझ्या लक्षात राहणार नाही. मी लिहनच देते' (माझ्या बुद्धिमत्तेवर केवढा विश्वास). वस्तूंची यादी व पैशांचं व्यस्त प्रमाण बघून मी पैशांकडे केविलवाणेपणे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, 'पुरतात एवढे! जास्त दिले की एखादा मित्र भेटतो, त्याला हॉटेलात चहा पाजवावा लागतो, वर सिग्रेटी फुकणं!' मी गप्पच बसलो. माझे 'आतले' पैसे घेऊन गेलो (तेही एक दुःख.) सर्व वस्तू घेऊन मिनीच्या कल्पनेइतकं लवकर परतलो. या दोन वर्षांत इतकं वेगात मी काम केलं म्हणून मिनी खूश झाली. कौतक करू लागली. लगेच मी बाहेर निघालो तर म्हणाली, 'हे काय! हे सगळं असंच काय टाकलंस! आय टाकलस! थोडीशी कोथिंबीर निवडून चिरून दे. थोडं खोबरं खवून दे, थोडे तीळ, खसखस बघून दे. बारीक खडे असतात कधी कधी..' मी जरा रागात म्हटलं, 'अजून काही थोडंसं | आहे का?' 'काही नाही बरं! बाकी सर्व मीच करणारे, फक्त एवढंच तर सांगितलं!' मिनीचं थोडंसं' व 'फक्त' काय असतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कोथिंबीर बार धुवून चिरून दिली. खोबरं खवून दिलं. खसखसे, तीळ निवडले, ताकही करायला लावलं. मग म्हणाली, 'अय्या! डाळ दळन आणायचीय की!' केवळ जिव्हालोल्यासाठी